Loading Events

An Employment Meet was organised in joint association with District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Pune. It was inaugurated at the hands of Smt. Anupama Pawar, Deputy Commissioner, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Pune. Assistant Commissioner Smt. Kavita Javale also was present for the inauguration.

Total 32 companies participated in the job fair having vacancies for 4933 vacant posts. Out of 642 participating candidates who got an opportunity to appear for the interviews, 342 candidates got selected.

 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे आणि एस एन डी टी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एस एन डी टी व्यवस्थापन इमारत येथे मंगळवार दिनांक २८ जुन २०२२ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मा. अनुपमा पवार, उपायुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागीय आयुक्तालय,पुणे हया यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उद्योजकांना आवाहन केलें की त्यांनी उमेदवारांची उमेद वाढवावी. तसेच त्यांनी रोजगार मेळाव्याचे महत्त्व विषद केले. तरुण पिढीने समाज उपयोगी उपक्रम हिरीरीने राबविण्याचे आवाहन केले.

सहआयुक्त मा. कविता जावळे यांनी यावेळी मेळाव्या संबंधी शासनाची भूमिका विषद केली.

प्राचार्य डॉ. मुक्तजा विकास मठकरी, एस एन डी टी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे यांनी महाविद्यालयाच्या समाजाभिमुख उपक्रमांतर्गत या मेळाव्यात सहभाग घेतला आहे असे नमूद केले. याप्रसंगी एस एन डी टी कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यायातर्फे समन्वयक प्रा. डॉ प्रीती पाटणकर यांनी आभार मानले. प्रा. अनुजा किणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

या मेळाव्यात ३२ कंपन्यांचा सहभाग होता.४,९३३ रिक्त पदे होती. या मेळाव्यासाठी ६४२ उमेदवार उपस्थित होते व ३५६ उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला.

Share This Story, Choose Your Platform!