Loading Events

The newly renovated Administrative Office was inaugurated by Hon’ble Minister of State Shri Abdulji Sattar (Revenue, Rural Development, Port Land Development and Special Assistance) on 23rd November , 2021. In his address, he emphasized that the increased participation of women in the social work can bring about a change in the society and Nation and appreciated contribution of SNDT College of Home Science in Women empowerment. The program was also attended by Dr. Dinesh Pardeshi, Director ADCC Bank, Shri. Bharat Seth Rajput, Industrialist, Aurangabad, Shri Umesh Walekar and Smt. Pravina Walekar, Industrialist, Aurangabad. Principal Dr. Muktaja Vikas Mathkari welcomed the guests.

 

‘१०० टक्के निकाल व १०० टक्के रोजगार हे एस.एन.डी.टी गृहविज्ञान महाविद्यालय पुण्याचे खास वैशिष्टय’: मा. नामदार अब्दुलजी सत्तार साहेब.

‘१०० टक्के निकाल व १०० टक्के रोजगार हे एस.एन.डी.टी गृहविज्ञान महाविद्यालय पुण्याचे खास वैशिष्टय’ आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी एस.एन.डी.टी. गृहविज्ञान महाविद्यालय, पुण्याच्या प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब (राज्यमंत्री-महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) यांच्या हस्ते पार पडले. उदघाटन प्रसंगी बोलताना माननीय सत्तार साहेबांनी भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या स्मृतीस अभिवादन करून गृहविज्ञान महाविद्यालय हे खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. समाजकामातील महिलांचा वाढता सहभाग हाच समाज व देशात परिवर्तन करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा विकास मठकरी यांनी महिलांच्या विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रसंगी माननीय डॉ. श्री. दिनेश परदेशी (संचालक, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्था ) त्याचप्रमाणे औरंगाबाद मधील प्रथितयश उद्योजक भरतशेठ रजपूत  व उद्योजक उमेश वालेकर व सौ.  प्रविणा वालेकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सौ. अनुजा किणीकर यांनी केले.

 

Share This Story, Choose Your Platform!