Inauguration of Our Lab School (Nursery School)
June 17, 2019
एस एन डी टी कॉलेज ऑफ होम सायन्स च्या ल्य़ाब स्कूल म्हणजेच नर्सरी स्कूल चे उद्घाटन दिनांक 17 जून 2019 सोमवार रोजी शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व सौ भारती अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जनसेवा फाउंडेशन च्या सौ मीना शहा तसेच प्राचार्य डॉक्टर मुक्तजा विकास मठकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी , पालक महाविद्यालयातील विद्यार्थ्यनी व नर्सरी स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलेली 30 छोटी मुले उपस्थित होती. ह्युमन डेव्हलपमेंट विभागाच्या समन्वयक सौ.मनिषा अष्टपुत्रे यांनी स्कूल ची वैशिष्ट्ये प्रास्ताविकात मांडली. सौ भारती देशपांडे यांनी उद्घाटनपर भाषणात तीन ते सहा या वयोगटातील मुलांना आनंददायी शिक्षण या स्कूलमधून मिळेल याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉक्टर मुक्तजा मठकरी य़ांनी शाळेचे पुनरुज्जीवन करण्यामागील आपली भूमिका मांडली.