लाॅकडाउन मध्ये ऑनलाईन क्लासेस घेऊन त्याची पहिली कमाई ससूनच्या कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी दान केली
May 29, 2021
“लाॅकडाउन मध्ये ऑनलाईन क्लासेस घेऊन त्याची पहिली कमाई ससूनच्या कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी दान केली”
एस एन डी टी गृह विज्ञान महाविद्यालय पुणे, येथे बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या वर्गात शिकणाऱ्या सुरूची शंकर मुगावे या विद्यार्थिनीने कोरोना महामारी मुळे लाॅकडाउन काळात लहान मुलांसाठी फॅब्रिक पेंटींग आणि कॅलिग्राफी चे ऑनलाईन क्लासेस घेऊन यामधील पहिली कमाई पाच हजार एकशे एक रुपये दिनांक: २९/०५/२०२१ रोजी ससून रुग्णालयातील गरीब आणि गरजू रूग्णांसाठी दान केली.
यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी काॅलेज काॅन्सीलच्या बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक यांच्या बैठकीत बोलताना सांगितले की, “अशाप्रकारे सुरूची सारख्या तरूण – तरूणींनी कोरोना सारख्या महामारीत रुग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांच्या सेवेसाठी लाॅकडाउनच्या काळातील स्वतःच्या वेळेचा सदुपयोग करून जी कमाई दान केली ही खूप कौतुकास्पद आणि प्रशंसनीय बाब आहे. इतर तरुणांनी सुरूची या तरूणीचा आदर्श घ्यावा, ही काळाची गरज आहे. कु. सुरूची शंकर मुगावे हिची नोंद बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या वार्षिक मॅगझिन मध्ये आवर्जून घेण्यात येईल जे इतर तरूण – तरूणींना प्रेरीत करेल”.